सुनियोजित विजवितरण करीता प्रशासकीय बैठक....
आर्णी :-
तालुक्यातील अनियमित विज पुरवठा होत असल्याने जनसामान्यांच्या मनात विज वितरण कंपनीच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया निर्माण होत आहे. शहरातील नागरिक वेगवेगळ्या प्रकारे आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे तालुक्यातील जनसुविधा विस्कळीत होऊ नये म्हणून ठाणेदार केशव ठाकरे यांनी पुढाकार घेऊन तहसीलदार यांना सविस्तर माहिती दिली त्या अनुषंगाने तहसीलदार वैषाख वाहुरवाघ यांनी तालुक्यातील सर्व अधिकाऱ्याची तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली. यावेळी दारव्हा विभागाचे
कार्यकारी अभियंता ब्रजेश गुप्ता, आर्णी उपअभियंता आर. टी. राऊत, आर्णी शहर अभियंता एस. वी. सोनटक्के, लोणबेहळ उपकेंद्र अभियंता एम. बी. गुल्हाने, नगरपरिषदेच्या हिना कदम, बापु चव्हाण नगर परिषद,सहायक गटविकास अधिकारी
सुधाकर पंडे, मंगेश शिरसाठ पाणी पुरवठा विभाग पंचायत समिती आर्णी यांना तहसीलदार वैषाख वाहुरवाघ यांच्या दालनात विज वितरण समस्या व सविस्तर चर्चा करण्यात आली. विज वितरण कंपनीच्या अनेक समस्या आहे. वादळ वारा, पाणी यामुळे शहरातील विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पुढिल पंधरा दिवसांत विज पुरवठा नियमित करण्यात येईल असे आश्वासन दिले.
लवकरच शहर आणि ग्रामीण भागातील फिडर वेगळे करून सर्व स्वतंत्र फिडर करून विज वितरण पुरवठा अखंडित न होता पुर्णत्वास येईल असे विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
सुनियोजित विजवितरण करीता प्रशासकीय बैठक....
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा