रवींद्र राठोड यांचे आर्णी तहसिलदार तथा कृषी अधिकारी यांना निवेदन*

*रवींद्र राठोड यांचे आर्णी तहसिलदार तथा कृषी अधिकारी यांना निवेदन*
*आर्णी तालुका अंतर्गत कृषी केंद्रा मार्फत शेतकऱ्यांची होणारी फसवणुक थांबवा*.
*या कृषी केंद्रावर नियंत्रना करीता भरारी पथक नेमण्यात यावा*
आर्णी तालुक्यातील कृषी केंद्रा मार्फत सध्या शेतकऱ्यांच्या ऐन पेरणीच्या सामोर कृषी केंद्रा मार्फत फसवणुक /अपहार तसेच ब्लॅकमेलींग केल्या जात आहे. आज शेतकरी बियाणे घेण्याकरीता परवानाधारक कृषी केंद्रावर गेल्यावर त्यांना पाहीजे त्या व्हेरायटीची बियाणे देण्यात येत नाही. व स्टॉक संपला आहे असे सागुन त्यांना फायदा असणाऱ्या व्हेरायटी जबरदस्ती दिल्या जात आहे. तसेच शेतकऱ्यांना एम.आर.पी. पेक्षा जास्त भावाने बियाण्याच्या बैगा दिल्या जात आहे. असा अनुभव अनेक शेतकऱ्यांना आला आहे. शेतकऱ्यांना ज्या व्हेरायटीवर नफा आहे ती व्हेरायटी शेतकऱ्यांना स्टॉक नाही असे सांगुन विकल्या जात आहे. नाईलाजास्तव शेतकऱ्यांना बियाने घ्यावे लागत आहे. त्यामुळे आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांना शंका आहे की तालुक्यातील कृषी केंद्र हे चांगल्या कंपनीच्या मागणी असणाऱ्या व्हेरायटी चे स्टॉक ठेवून नंतर जास्त भावाने विकण्यात येईल असे वाटत आहे. त्याकरीता आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे की, तालुक्यातील कृषी केंद्राची आपण आपल्या स्तरावर चौकशी करावी, कृषी केंद्राचे स्टॉक तपासावे तसेच विक्री किती झाले आहे हे पण तपासावे. आपण एक तालुक्यातील कृषी केंद्रावर तपासणी करीता भरारी पथका नेमावा व त्यांना सक्रिय करुन कृषी केंद्रावर कमीत कमी येत्या १५ दिवस तरी नियंत्रण ठेवावे अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे. निवेदन देते वेळी आर्णी तालुक्यातील सरपंच संघटनेचे अध्यक्ष रवींद्र राठोड यांच्यासह राजेश चव्हाण ,अमोल बर्डे ,गणेश आडे ,गजानन जाधव ,गणेश मोरे ,मनोज राठोड ,अभिषेक राजूरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
*कृषी अधिकाऱ्यांचे नियोजन ढिसाळ* शेतकऱ्यांना बियाणे व्यवस्थित मिळते की नाही याकडे तालुका कृषी अधिकारी यांनी लक्ष देणे आवश्यक असते परंतु आर्णी तालुक्यात असे होताना दिसत नाही विशेष म्हणजे कृषी सहायक हे ही शेतकऱ्यांना बियाणे बाबद मार्गदर्शन करताना दिसत नाहीत त्यामुळे सगळे कृषी केंद्र चालक हे शेतकऱ्यांची फसवणूक करीत आहे त्यामुळे आर्णी तालुक्याला ऐक कार्यसक्षम कृषी अधिकारी देण्यात यावा अशीही मागणी शेतकरी करीत आहे.
*शेतकऱ्याची फसवणूक केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल* ग्रामीण भागातील तसेच आर्णी तालुक्यातील शेतकऱ्यांची जर कृषी केंद्र चालक फसवणूक करीत असेल व यावर जर तालुका कृषी अधिकारी यांचे नियंत्रण नसेल तर शेतकऱ्यांसाठी तीव्र आंदोलन करणार. रवींद्र राठोड भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...