जवळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान व समाधान शिबीर’ उत्साहात संपन्न

 जवळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान व समाधान शिबीर’ उत्साहात संपन्न



आज दिनांक १४ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता ग्रामपंचायत कार्यालय जवळा येथील सभागृहात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान व समाधान शिबीर उत्साहात पार पडले. नागरिकांना विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला आर्णीचे तहसीलदार श्री. वैशाख वाहुरवाघ, पंचायत समिती आर्णीचे गटविकास अधिकारी श्री. खारोडे, निवासी नायब तहसीलदार श्री. उदय तुंडलवार, नायब तहसीलदार डॉ. संतोष आदमुलवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


शिबिरामध्ये अॅड. प्रमोद चौधरी, प्रगतिशील शेतकरी श्री. प्रकाश बुटले (रा. लोनबेहळ) व श्री. गणेश मोरे (रा. जवळा) यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. या समाधान शिबिराच्या माध्यमातून तब्बल ४२९६ लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ प्रमाणपत्र व सेवा प्रदान करण्यात आल्या.


कार्यक्रमाची प्रस्तावना मंडळ अधिकारी श्री. एस. एस. रोहनकर यांनी केली. जवळा मंडळातील ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, पशुसंवर्धन अधिकारी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, महसूल सेवक, टपाल विभाग, भूमी अभिलेख विभाग तसेच इतर सर्व शासकीय विभागांनी शिबिरात सक्रिय सहभाग घेतला.


या शिबिरामध्ये १६ पेक्षा अधिक महसुली व इतर विभागांच्या सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या. त्यामध्ये प्रलंबित फेरफार प्रकरणे, ७/१२ मधील चुका दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ व ८अ उतारे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र, अकृषक (एन.ए.) परवानगी, वारस फेरफार, सामाजिक अर्थसहाय्य योजना, विद्यार्थ्यांसाठी विविध दाखले, अ‍ॅग्री स्टॅक व पीएम किसान योजनेबाबत मार्गदर्शन व लाभ आदी सेवांचा समावेश होता.शिबिरादरम्यान नागरिकांच्या तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यात आले.

या प्रसंगी मंडळ अधिकारी एस. एस. रोहनकर, डी. व्ही. मिठे, सी. जे. पांडे, व्ही. ए. शेख, आर. एल. गोखे, विजय ढेकाळे, पी. एस. राऊत यांच्यासह महसूल विभाग व इतर शासकीय विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...